हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही प्रवाश्यांची चिंता वाढणार आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. पुणे विभागात काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा थेट परिणाम वरील शहरांकडे जाणाऱ्या रेल्वेवर होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे प्रवास करणार असणार तर तुम्हाला रेल्वेने रद्द केलेल्या रेल्वे गाड्या बद्दल माहिती असणे महत्वाचे आहे.
नीरा ते लोणंद दरम्यान असणार मेगाब्लॉक : Indian Railways
पश्चिम महाराष्ट्रातीलतील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नीरा ते लोणंद दरम्यान रेल्वे मेगा ब्लॉक घेणार आहे. नीरा ते लोणंद दरम्यान दुहेरीकरणाच्या तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक रेल्वे विभागाद्वारे घेण्यात येणार आहे. पुणे विभागाअंतर्गत घेण्यात येणार हा ब्लॉक 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. त्यामुळे या काळात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये काही गाड्या पूर्णपणे रद्द असतील तर काही अंशतः बंद असतील .
कोणत्या रेल्वेगाड्या रद्द असतील :
मध्य रेल्वे विभागात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे “पुणे-फलटण”, “लोणंद – फलटण” आणि “पुणे – सातारा” या डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर पुणे एक्सप्रेस देखील 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान उशिराने धावणार आहे.
21 व 22 ऑक्टोबर रोजी सुटणारी “कोल्हापूर -पुणे एक्सप्रेस” “कोल्हापूर ते सातारा” दरम्यानच चालवली जाणार आहे.
22 ऑक्टोबर रोजी कोयना एक्सप्रेस मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे स्टेशन वरून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच ही गाडी नेहमीच्या वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटेल.
कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस (Indian Railways) छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सकाळी अडीच तास उशिराने म्हणजेच 10 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे.