पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना महिला हॉकी टीमला अश्रू अनावर (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला बलाढ्य ब्रिटन कडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पदकाचे स्वप्न अधुरे राहिले. ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाचा ४-३ असा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला असला तरी आजवरच्या इतिहासातील ही महिला हॉकी संघाची सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला तसेच चिंता करू नका देशाला तुमचा गर्व आहे असं म्हणत त्यांचा उत्साह वाढवला. दरम्यान मोदींशी फोनवर बोलताना महिला खेळाडूंना अश्रू अनावर झाले. परंतु तुम्ही रडू नका. तुम्ही घेतलेली मेहनत करोडो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे असे म्हणत मोदींनी शाबासकी दिली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट देखील केलं होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि म्हटले आहे की, “मुलींच्या कामगिरीने नव्या भारताची भावना प्रदर्शित केली आहे.  या महान कामगिरीची आम्हाला नेहमी आठवण राहील.”जरी आपण महिला हॉकीमध्ये खूप कमी फरकाने पदक गमावले. परंतु हा संघ नवीन भारताची भावना प्रतिबिंबित करतो

Leave a Comment