हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. दोन्ही पक्षातील युतीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. अशात आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. मनसे व भाजप एकत्र आल्यास त्यांचा नकीच आनंद होईल. राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही,असे नांदगावकर यांनी म्हंटले आहे.
मनसेचे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याबाबत चर्चा केली नसल्याचे सांगितले. मात्र, भाजपसोबत युती करण्याबाबत आता मनसे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. मनसे व भाजप युतीबाबत माध्यमांनी नांदगावकर यांना विचारले असता राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत. मात्र, मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाची सीडी चंद्रकांत पाटील यांनी ऐकल्यानंतर राज ठाकरे याना बहेणार असल्याचे सांगितले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत अनेक विषयांवर चर्चाही केली. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेत त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे व भाजप बरोबरच्या युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे.