Commonwealth Games मध्ये भारताने रचला इतिहास, लॉन बॉल्समध्ये पहिल्यांदाच मिळवले गोल्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बर्मिंघम : वृत्तसंस्था – बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताने इतिहास रचला आहे. भारताने पहिल्यांदाच लॉन बॉल्समध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. भारताच्या लव्हली, पिंकी, नयनमोनी आणि रुपा यांनी दक्षिण आफ्रिकेचा महिला फोर फायनलमध्ये 17-10 ने पराभव करून गोल्ड मेडल पटकावले आहे.

लॉन बॉल्स या क्रीडा प्रकारामध्ये (Commonwealth Games) दक्षिण आफ्रिकेने 3 वेळा कॉमनवेल्थ खेळात गोल्ड मेडल पटकावले होते. याच दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने इतिहास रचला आहे. याआधी (Commonwealth Games) भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 16-13 ने पराभव करून फायनल गाठली होती.

सेमी फायनलमध्ये भारतीय टीम 0-5 ने पिछाडीवर होती, पण यानंतर टीमने (Commonwealth Games) धमाकेदार कमबॅक करत विजय प्राप्त केला. लॉन बॉल्समध्ये भारताच्या लव्हली चौबे, रुपा राणी टिरकी, पिंकी आणि नयनमोनी साईकिया यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार