Union Budget 2020 | अर्थमंत्री हे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे प्रमुख असतात. केंद्रीय मंत्रिमंडळात वरिष्ठ पदाधिकारींपैकी एक म्हणजे अर्थमंत्री.सरकारच्या आर्थिक धोरणासाठी ते जबाबदार असतात. याचा एक भाग म्हणून, अर्थमंत्र्यांचा एक प्रमुख कर्तव्य म्हणजे संसदेत वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे, जे आगामी आर्थिक वर्षामध्ये कर आणि खर्च करण्याच्या सरकारी योजना असतात.
१. भारताचे माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहे. भारताच्या इतिहासातील कोणत्याही अर्थमंत्र्यांकडून हे सर्वात जास्त वेळा सादर केलेलं अर्थसंकल्प आहे, त्यानंतर आठ वेळा अर्थ संकल्प सादर करून चिदंबरम दुसऱ्या स्थानावर आहेत
२.स्वतंत्र भातातील इंदिरा गांधी ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी अर्थसंकल्प सदर केला.
३. 7 एप्रिल 1860 रोजी तत्कालीन अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश शासनाचे भारताचे पहिले बजेट सादर केले.
४. भारतीय गणराज्याचे पहिले अर्थसंकल्प जॉन मथई यांनी सादर केले.
५. राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू हे एकाच कुटुंबातील एकमेव तीन पंतप्रधान आहेत ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला. 1987-89 मध्ये व्ही पी सिंह यांनी सरकार सोडल्या नंतर गांधीनी अर्थसंकल्प सादर केले.
६. 1991 मध्ये अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्वात दीर्घ भाषण केले होते जे १८६५० शब्दांचे होते.
७. अंतरिम अर्थसंकल्प वितरीत करताना 1977 मध्ये एचएम पटेल यांनी 800 शब्दांसह सर्वात कमी अर्थसंकल्पीय भाषण दिले होते.
८. फेब्रुवारी 1964 रोजी मोरारजी देसाई यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी अर्थसंकल्प सादर केले.