नवी दिल्ली । मे 2021 मध्ये भारताची निर्यात 67.39 टक्क्यांनी वाढून 32.21 अब्ज डॉलर झाली. बुधवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत याबाबत माहिती देण्यात आली. वाणिज्य मंत्रालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या कालावधीत इंजीनिअरिंग, औषधी, पेट्रोलियम उत्पादने आणि रसायनांच्या निर्यातीत विशेषतः वेगवान वाढ झाली.
गेल्या वर्षी मेमध्ये 19.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात आणि मे 2019 मध्ये 29.85 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात झाली होती. या निवेदनात असे म्हटले आहे की,”मे 2021 मध्ये आयात 48.54 टक्क्यांनी वाढून 38.53 अब्ज डॉलरवर गेली आहे, मे 2020 मधील आयात 22.86 अब्ज डॉलर्स आणि मे 2019 मध्ये 46.68 अब्ज डॉलर्सची आयात झाली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, “मे 2021 मध्ये भारत 6.32 अब्ज अमेरिकन डॉलरची व्यापार तूट असलेला निव्वळ आयातकर्ता आहे. मे 2020 मधील व्यापार तूट (Trade Deficit) 3.62 अब्ज डॉलर होती. मे 2020 च्या तुलनेत व्यापार तूट 74.69 टक्क्यांनी वाढली.”
तेलाची आयात 9.45 अब्ज डॉलर्स होती
तेलाची आयात (Oil Import) समीक्षाधीन महिन्यात 9.45 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली, जी मे 2020 मध्ये 7.77 अब्ज डॉलर्स होती. यावर्षी एप्रिल ते मे या कालावधीत निर्यातीत वाढ होऊन ती 62.84 अब्ज डॉलरवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात 29.6 अब्ज डॉलर आणि एप्रिल-मे 2019 मध्ये 55.88 अब्ज डॉलर्स होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा