अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात ती जगातील सर्वांत महागडी गाडी या मराठी माणसाच्या दारात

Arun Patil Car
Arun Patil Car
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अतिशय आकर्षक दिसणारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक असलेली ‘कॅडिलॅक‘ ही जगातील सर्वांत महागडी मोटार एका मराठी माणसाने विकत घेतली आहे. भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती अरुण पाटील यांनी ही गाडी घेतली असून कॅडिलॅक गाडी असणारे ते भारतातील पहीले आहेत.

‘कॅडिलॅक’ गाडीची किंमत साडे पाच कोटी इतकी आहे. ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीन अत्याधुनिक असून गाडीमधे अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. कारच्या चारही बाजूंनी सेन्सर्स आहेत. रस्त्यात खड्डा आला, अपघात होणार असेल, तर कार स्वतःच सावरते. कारचा वेग आणि ब्रेक ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात. कारच्या मागे-पुढे कॅमेरे आहेत. गाडीत क्लायमेट कंट्रोलही होतं. गाडीत वायफायचीही सुविधा आहे.

या सर्व सोईंमुळे ‘कॅडिलॅक’ जगभरातील अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि उद्यागोपतींची पहिली पसंती आहे. आता हीच गाडी मराठी माणसाने घेतल्याने अरुण पाटील यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

इतर महत्वाचे –

पुण्यात एलिअन दिसला, पंतप्रधान कार्यालयाला पत्र!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना या मराठी माणसाकडे सोपवायची होती रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी

इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?