अयोध्येत उभारणार देशातील सर्वात मोठी मशीद; कॅन्सर हॉस्पिटल व शैक्षणिक संकुलसुद्धा बांधण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्यामधील मशिदीसाठी (Mosque In Ayodhya) न्यायालयाकडून मुस्लिम समाजाकडे 5 एकर  जमीन सुपूर्द करण्यात आल्यानंतर त्या जमिनीवर  मुस्लिम समाजाकडून (Muslim Community) भारतातील सर्वात मोठी मशीद बांधण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुंबईमधील रंग शारदा येथे पार पडला असून पुढील काळात अयोध्यामध्ये मशीद व त्यासोबतच कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital) व शैक्षणिक संकुल सुद्धा (Educational Complex) बांधण्यात येणार आहे.

अयोध्या मध्ये उभारण्यात येणारी मशीद  व शैक्षणिक संकुल  हे सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने बांधण्यात येणार आहे. मशिदीला ” मुहम्मद बिन अब्दुल्ला ” असे नाव देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. “मोहम्मद बिन अब्दुल्ला” जे “प्रॉफिट हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम” यांचे वडील होते. त्यांच्याच पवित्र नावावरून या मशिदीला नाव देण्यात येणार आहे.

हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली  रंग  शारदा  हॉल  मध्ये पार पडलेल्या पायाभरणीच्या  कार्यक्रमासाठी  मुस्लिम समाजातील उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल – हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकिवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह अनेक विद्वान, पीर, मौलाना या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कॅन्सर हॉस्पिटल आणि शैक्षणिक संकुल :

मशीद परिसरात एकूण 9000 मुस्लिम बांधव  नमाज अदा करू  शकतील. त्याचबरोबर मशिदीमध्ये वरच्या  मजल्यावर 4000 महिलांना नमाज  अदा करण्यासाठीची विशेष सोय करण्यात येणार आहे. मशिदी सोबतच कॅन्सर हॉस्पिटल या परिसरात होणार आहे. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचार दिले जातील जेणे करून गरजु व्यक्तींना उपचार घेण्यास मदत होईल. शैक्षणिक संकुलची उभारणी देखील याचं परिसरात होणार आहे. ज्यामध्ये मुला-मुलींसाठी उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी भव्यदिव्य लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे.