हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक एयरलाईन्स कंपन्या आहेत. त्यातील इंडिगो ही भारतातील एक सगळ्यात मोठी एअरलाईन कंपनी आहे. इंडिगो त्यांच्या प्रवाशांसाठी अनेकवेळा स्वस्तात प्रवास करण्याच्या ऑफर देत असतात. जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना देखील विमानाने प्रवास करता येतो. अशातच आता इंडिगोने पुन्हा एकदा त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर लॉन्च केलेली आहे. इंडिगोने गेट अवे सेलची घोषणा केलेली आहे. इंडिगोने केलेल्या या ऑफरमुळे आता ग्राहकांना देशांतर्गत तसेच देशाबाहेरील प्रवासाच्या तिकिटांवर मोठ्या प्रमाणात ऑफर देण्यात आलेली आहे. इंडिगोची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.
क्रिसमसच्या मुहूर्तावर इंडिगोने त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर लॉन्च केलेली आहे. देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर 23 जानेवारी ते 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. देशांतर्गत प्रवाशाच्या तिकिटाची किंमत ही केवळ 1 हजार 999 पासून सुरु होणार आहे. तर इंटरनॅशनल प्रवासाची किंमत ही केवळ 4499 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे इंडिगोने काही खास कार्डवर देखील जास्तीची 50% पर्यंत सूट देण्यात आलेली आहे.
यामध्ये प्रवाशांना आणखी काही खास ऑफर देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्ही प्रीपेड एक्सेस बॅगेज ऑप्शन 15 kg, 20 kg, आणि 30 kg स्टॅंडर्ड सिलेक्शन आणि xl शीटची सुविधा देखील घेऊ शकता. या ऑफरमध्ये ऍडव्हानची किंमत देशांतर्गत उड्डाणासाठी 599 रुपयांपासून सुरू होते, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 699 पासून सुरु होते.
क्रेडिट कार्डवर देखील सूट
जर प्रवाशांकडे फेडरल बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला अतिरिक्त आणखी 15% सूट मिळणार आहे. यामध्ये देशांतर्गत उड्डाणासाठी तुम्हाला 15 टक्के सूट तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी जवळपास 10 टक्के सूट मिळणार आहे. अशाप्रकारे आता तुम्ही टॅक्सी अथवा बसच्या तिकिटाच्या दरामध्ये विमानाने प्रवास करू शकता. क्रिसमस तसेच नवीन वर्ष तोंडावर आले असताना इंडिगो कडून त्यांच्या प्रवाशांसाठी अत्यंत स्वस्त दरात ऑफर लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही केवळ 1199 मध्ये तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकता.