इंडिगोने रचला इतिहास; एका वर्षात केला 10 कोटी प्रवाशांचा आकडा पार

Indigo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंडिगो ही भारतातील विमान प्रवासी सेवा देणारी कंपनी आहे. ज्याचा वापर करून अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निर्धास्तपणे प्रवास करतात. इंडिगो ही भारतीयांसाठी अधिक भरवशाची कंपनी आहे. विमानाने प्रवास करायचे झाल्यास इंडिगो कंपनीचे तिकीट आहे का असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे यास लोकांची जास्त पसंती आहे. म्हणूनच इंडिगो कंपनी भारतातील अशी कंपनी बनली आहे जिने एका वर्षात तब्बल 10 कोटी प्रवाश्यांचा आकडा पार केला आहे. हा विक्रम करणारी ती पहिली कंपनी ठरली आहे.

इंडिगो ठरली जगातील टॉप 10 एअरलाइन्स कंपनी

इंडिगोने 10 कोटींचा आकडा पार केल्यामुळे विमान कंपन्यामध्ये या कंपनीने इतिहास रचला आहे. त्यामुळे कंपनी ता यशाबद्दल बोलताना म्हणते की, ” आत्तापर्यंत अशी कामगिरी कोणत्याही भारतीय विमान कंपनीने केलेली नाही. 10 कोटींचा आकडा पार केल्यामुळे आता आम्ही जगातील टॉप 10 एअरलाइन्समध्ये सामील झालो आहोत. या कालावधीत, इंडिगोने सर्वाधिक उड्डाणे उडवण्याच्या बाबतीत जगातील 10 प्रमुख एअरलाइन्समध्ये यशस्वीपणे आपले स्थान निर्माण केले आहे.” असे कंपनीने सांगितले.

CEO पीटर एल्बर्सने मानले कर्मचार्‍यांचे आभार

इंडिगोचे कंपनीचे CEO पीटर एल्बर्स यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ” हे यश मिळाल्यामुळे लोकांचे आमच्यावर प्रेम आणि विश्वास असल्याचे दिसून येते. तसेच हा आकडा गाठण्यासाठी आमच्या कर्मचार्‍यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.”

इंडिगोने सूरु केली 20 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणे

एकीकडे यशाची पायरी चढत असताना दुसरीकडे इंडिगोने मागील सहा महिन्यात 20 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर आपली उड्डाणे सुरु केली. त्यामुळे कंपनीने आपली पोहोच देशांतर्गत मार्गांवरही वाढवली आहे. तर इंडिगो आता लवकरच आपली सेवा इंडोनेशियातील बाली आणि सौदी अरेबियातील मदिना येथे देण्यास सुरुवात करणार आहे. इंडिगोचा नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारात हिस्सा हा 61.8 टक्के होता. ज्यामागे एअर इंडियाचा हात होता. त्यामुळे कंपनीला चांगलाच फायदा होणार आहे. हे नक्की.

इंडिगोशी स्पर्धा करण्यासाठी कोणतीच कंपनी नाही

एअर इंडियाचा देशांतर्गत बाजार हिस्सा हा इंडिगोच्या सहपट अधिक आहे. मात्र असे जरी असले तरी इंडिगोशी स्पर्धा करण्याच्या स्थितीत कोणतीच कंपनी स्पर्धा करू शकत नाही. कंपनीने 500 Airbus A320 खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. यानंतर कंपनीच्या ताफ्यात 1000 हून अधिक विमाने असतील. त्यामुळे विक्रमासोबतच या कंपनीला तोडीस तोड कंपनी कोणतीच नाही.