Indigo ची खास सर्व्हिस ! आता तुमचे सामान फक्त 325 रुपयांमध्ये विमानतळावरून घरापर्यंत पोहोचवले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कुठल्यातरी महत्त्वाच्या कारणासाठी जायचं आहे की, प्रवास करायचा आहे, सामान किती नेणार आहे, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग आणि कन्व्हेयर बेल्टवर थांबणं. या सगळ्या तणावातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने खास सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिस अंतर्गत तुमचा माल तुमच्या घरापासून तुम्ही जिथे जात आहात तिथे पोहोचवला जाईल.

इंडिगोने म्हटले आहे की,” ते घरोघरी सामान ट्रान्सफर सर्व्हिस सुरू करत आहेत. जिथून प्रवास सुरू होत आहे, तिथून सामान सुरक्षितपणे उचलले जाईल आणि तुमच्या इच्छित स्थळी पोहोचवले जाईल.”

कोणत्या शहरांमध्ये ही सुविधा मिळणार आहे जाणून घ्या
इंडिगोची ही खास सर्व्हिस सध्या बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसाठी सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले आहे की,” ग्राहकांचा माल कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे उचलला जातो आणि इच्छित स्थळी पोहोचवला जातो.”

किती पैसे द्यावे लागतील ते जाणून घ्या
या सुविधेसाठी प्रवाशांना फक्त 325 रुपये मोजावे लागणार आहेत. या सर्व्हिसचे नाव 6eBagport असे आहे, ज्याद्वारे ग्राहक फ्लाइट टेक ऑफ होण्यापूर्वी 24 तास आधी बॅगेज सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. या सर्व्हिससाठी कंपनी CarterPorter सोबत पार्टनरशिप करेल.

इंडिगोने अनेक मार्गांवर डायरेक्ट फ्लाइट सर्व्हिस सुरू केली
>> इंडिगो 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरपासून दिल्ली पाटणा, पाटणा दिल्ली, पाटणा मुंबई आणि पाटणा हैदराबाद, बंगळुरू पाटणा मार्गांवर नवीन डायरेक्ट फ्लाइट सुरू करणार आहे.
>> इंडिगो 2 नोव्हेंबरपासून ओडिशातील भुवनेश्वर ते राजस्थानमधील जयपूरला जोडणारी डायरेक्ट फ्लाइट सर्व्हिस सुरू करणार आहे.
>> कानपूर आणि दिल्ली दरम्यान 31 ऑक्टोबर 2021 पासून डायरेक्ट फ्लाइट सर्व्हिस सुरू होणार आहे, तर 1 नोव्हेंबर 2021 पासून कानपूर, हैदराबाद, कानपूर बंगलोर आणि कानपूर मुंबई दरम्यान डायरेक्ट फ्लाइट सर्व्हिस सुरू होणार आहे.

Leave a Comment