Indigo Monsoon Flight Sale offer : फक्त 1499 रुपयांत विमानप्रवास; Indigo ची खास ऑफर

Indigo Monsoon Flight Sale offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indigo Monsoon Flight Sale offer । विमानातून प्रवास करायला कोणाला नाही आवडत? उंच हवेतून सफर करण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते.. परंतु विमानाच्या महागड्या तिकिटांमुळे सर्वसामान्याना इच्छा असूनही विमानातून प्रवास करता येत नाही… तुम्हीही याच कॅटेगरी मधील असाल तर आता चिंता करू नका… विमान कंपनी Indigo ने प्रवाशांसाठी बम्पर ऑफर आणली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 1499 रुपयांत विमानातून भारतात कुठेही प्रवास करू शकता. यामुळे विमानातून प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते … ते सुद्धा अगदी कमी खर्चात

काय आहे ऑफर? Indigo Monsoon Flight Sale offer

सध्या पावसाळा सुरु असून पावसाळ्याच्या या दिवसात अनेक पर्यटक घराबाहेर पडतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. याच निमित्ताने इंडिगोने “मान्सून सेल आयोजित केला आहे. या सेलच्या माध्यमातून (Indigo Monsoon Flight Sale offer) देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1499 रुपयांत करता येणार आहे तर परदेश वारी करायची असेल तर ती सुद्धा फक्त ४,३९९ रुपयांत तुम्ही करू शकता. इंडिगोचा हा सेल २४ जून ते २९ जून २०२५ पर्यंत चालेल, म्हणजेच तुमच्याकडे बुकिंगसाठी मर्यादित वेळ आहे. या वेळेत बुक केलेली तिकिटे १ जुलै ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यानच्या प्रवासासाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. तुम्ही आत्ताच तुमच्या पुढच्या महिन्याचे प्लॅनिंग सेट करून विमान तिकीट बुक करू शकता.

आणखी एक गोष्ट म्हणजे, इंडिगोचं फक्त तिकीटच स्वस्त आहे असं नाही, तर प्रवाशांचा प्रवास सोप्पा आणि आरामदायी व्हावा यासाठी इतर सेवांवरही डिस्काउंट (Indigo Monsoon Flight Sale offer) देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, प्री-पेड अतिरिक्त बॅगा घेऊन जाण्यावर ५०% पर्यंत सूट दिली जात आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १५ किलो, २० किलो आणि ३० किलो सामानाच्या पर्यायांवरही सूट दिली जात आहे. यासोबतच, फास्ट फॉरवर्ड सेवेवर ५०% पर्यंत सूट देखील आहे, जेणेकरून तुम्ही विमानतळावर लांब रांगा टाळू शकाल आणि तुमची बॅग लवकर पोहोचवली जाईल.जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल आणि अधिक आराम हवा असेल, तर इंडिगोस्ट्रेच सीटचा पर्याय देखील आहे, जो ९,९९९ रुपयांपासून सुरू होतो. त्यात अधिक लेगरूम आणि यूएसबी-सी पोर्ट, मोबाईल ठेवण्यासाठी विशेष पीईडी होल्डर आणि पॉवर सॉकेट सारखी वैशिष्ट्ये असतील. इंडिगोच्या या खास सुविधांमुळे आणि डिस्काउंट ऑफरमुळे मध्यमवर्गीय प्रवाशांना मोठा फायदा होणार हे निश्चित.