औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये जवळपास सर्वच वाहतूक कोलमडली होती. इंडिगोने देखील औरंगाबाद विमान सेवा 30 जून पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यासह देशात कोरनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. म्हणून इंडिगो कंपनीने तीन दिवस विमान सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत महिन्यातून तीन दिवस विमान सेवा देण्यात येणार आहे अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी ही माहिती दिली आहे.
त्यानुसार २१ आणि २५ जून रोजी हैदराबाद-औरंगाबाद आणि औरंगाबाद-हैदराबाद हे विमान उड्डाण घेणार आहे. तसेच ११ जून रोजी औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा चालवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता हळूहळू इतर कंपन्यांच्याही शहरातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.