खासदार नवनीत राणांना उच्च न्यायालयाचा दणका : 2 लाखांचा दंड, जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा निर्वाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा नीर्वाळा देत उच्च न्यायालयाने आज नवनीत राणा कौेर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून न्यायालयाने 2 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे . तर आगामी सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सदर न्यायालयाच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा दावा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयामध्ये केला होता. सदर दावा माननीय उच्च न्यायालयाने आज दिनांक 8 जूनला निकाली काढाला आहे.
सदर प्रकरण हे घटनेवरील घोटाळा असल्याचे मत नोंदविले आहे. तर सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना रु.2 लक्षचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सदर निर्णयानंतर राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे .

प्रकरणाची दाद माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या वतीने मा. ऊच्च न्यायालयात एँड. सी. एम. कोरडे, अँड.प्रमोद पाटील व अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

You might also like