हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BAMCEF : व्यक्तीपुजक संघटना सामजिक परिवर्तनात अडथळा ठरण्याबरोबरच कार्यकर्ता व समाज जीवनात निराशा उत्पन्न करतात. त्यामूळे उद्दिष्ट, विचारधारा सिद्धांत मुल्ल्यांना प्राधान्य देणाऱ्या संघटनांसोबत लोकांनी जुळावे असे आवाहन BAMCEF चे राज्य संघठन सचिव एम डी चंदनशिवे यांनी केले.
पुणे येथील सुयश अकॅडमी मध्ये BAMCEF परिवाराच्या वतीने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. यावेळी मूळनिवासी संघ, मूळनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ, विध्यार्थी संघ, इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. चंदनशिवे पुढे म्हणाले की,” व्यक्तिपुजक संघटना या संघटना नसून केवळ गर्दी असते. ज्या संघटनेचे नाव घेताच नेतृत्वाचे नाव पुढे येते ते संगठन नसते. संघटना व्यक्तीच्या नव्हे तर संघटनेच्या नावाने ओळखली जावी. व्यक्तीचे कौशल्य हा सद्गुण ठरत नाही. ते कौशल्य उद्देश्यासाठी वापरले जाते की नाही यावर कौशल्य हा सद्गुण की दुर्गुण हे ठरते. राष्ट्र निर्माणासाठी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही व धर्मनिरपेक्षता या संविधानिक आदर्श मानवी मूल्यांच्या प्रस्थापणेसाठी मूळनिवासी बहुजनानी संघठीत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज विषद केली.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक BAMCEF चे पुणे जिल्हा अध्यक्ष शहाजी गोरवे यांनी केले. सूत्रसंचालन महासचिव उमेश भारतीय यांनी केले तर आभार मूलनिवासी संघाचे उपाध्यक्ष रमाकांत शिंदे यांनी मानले. या प्रशिक्षण शिबिरासाठी मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी ऍड. मोहन सोनवणे, मूलनिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिगंबर मोरे, बामसेफ पुणे जिल्हा प्रभारी सुरेश कांबळे, मूलनिवासी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश सरोदे महासचिव उमेश भारतीय, संघटन सचिव ऍड. आंबादस बनसोडे, ऍड. एस.डी. रोकडे, दयानंद चव्हाण, MNT न्यूज नेटवर्कचे निळकंठ लांडगे, व्ही जे वाघमारे, सुनील जावीर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
हे पण वाचा :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवसापासून सुरु होणार अधिवेशन
शिवसेनेचे खासदारही बंडाच्या तयारीत?? मातोश्रीवरील बैठकीत 7 जणांची दांडी??
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना- राष्ट्रवादीत रस्सीखेच