इंदूर । मध्य प्रदेशातील इंदुरमधून एक विचित्र किंवा सहजासहजी विश्वास बसणार नाही अशी घटना समोर आली आहे. या घटनेबाबत वाचून तुम्हीही विचारात पडाल. जवळपास ३ वर्षांआधी बेपत्ता झालेली महिला सुखरूप घरी परतली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, ३ वर्षे ४ महिन्याआधी इंदुरची एक महिलाशिर्डीला गेली होती आणि तिथे ती बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता झालेली महिला गेल्या शनिवारी सापडली. एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, २०१७ मध्ये ३८ वर्षीय महिला शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात गेली होती आणि मंदिरातून बाहेर आल्यावर बेपत्ता झाली’.
यानंतर बेपत्ता महिला दीप्तीचा पती मनोज सोनीने बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपिठात आपल्या पत्नीला शोधण्यासाठी Habeas Corpus पिटिशन दाखल केली होती. यावर बॉम्बे हायकोर्टाने महाराष्ट्रातील टॉप पोलीस अधिकाऱ्याला शिर्डीच्या मंदिराजवळून गायब होणाऱ्या महिलांचा तपास ह्यूमन ट्रॅफिकिंगच्या दृष्टीने करण्याचा आदेश दिला. मनोजचे वकिल सुशांत दीक्षित यांनी सांगितले की, गेल्या गुरूवारी सायंकाळी दीप्ती तिच्या बहिणीच्या घरी परतली. शुक्रवारी याची माहिती जस्टीस रवींद्र वी घुघे आणि जस्टीस बी.यू.देवदवार यांनी दिली. मनोजच्या सासऱ्यांनी फोन करून कोर्टाला दीप्तीची पसरण्याची बातमी दिली होती आणि सांगितले की, ३ वर्षांपासून दीप्ती इंदुरमध्येच होती आणि चेकअप केल्यावर समोर आलं आहे की, दीप्तीची मानसिक स्थिती ठिक नाही.
मनोज सोनीने सांगितले की, मी वडोदऱ्यात आपल्या ड्रायव्हिंग जॉबमध्ये होतो. तेव्हाच मला सायंकाळी ६ वाजता फोन आला की, माझी पत्नी इंदुरमधील बहिणीकडे परतली आहे. मी इंदुरला गेलो आणि तिला भेटलो. तिने हे नाही सांगितलं की, गेल्या ३ वर्षांपासून ती कुठे होती. तिने सांगितले की, ती मंदिराबाहेर दुकानात काही खरेदी करायला गेली होती तिथेच बेशुद्ध झाली. तिला काहीच आठवत नाही. दीप्तीने आपल्या परिवाराला सांगितले की, ती ३ वर्षांपासून इंदुरमधील एका वयोवृद्ध महिलेसोबत राहत होती. दीप्ती हे सांगू शकत नाहीये की, ती शिर्डीहून इंदुरला कशी पोहोचली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’