हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात आज सकासकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणाऱ्या खाजगी प्रवाशी बसचा (Bus Accident) अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा बस अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर अपघातग्रस्त बस इंदोर शहरातून अकोल्याकडे जात होती. त्याच वेळी रस्त्यात बस मध्ये बिघाड झाला. गाडी दुरुस्त करण्यासाठी चालक खाली उतरला. त्या ठिकाणी उतार असल्यामुळे चालकाने टायरच्या खाली लाकडाचा अडथळा लावला होता.जेणेकरून बस जाग्यावरून हळू नये … परंतु बसच्या टायरखाली लावलेले लाकूड सरकलं आणि उतार असल्याने बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी आणि बसला दरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत कार्य सुरु केले.
यावेळी बस दरीत कोसळली त्यावेळी बस मधील अनेक प्रवाशी झोपेत होते. तर काहीजण आधीच खाली उतरले होते. अचानक घडललेया या घटनेनं झोपलेल्या प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली. खाली उतरलेल्या प्रवाशांनी दरीत कोसळलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले तसेच या अपघातानंतर पोलीस कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि रुग्णावाहिका दाखल झाल्या.