Indurikar Maharaj : मला घोडे लावा, पण माझ्या मुलीचा …; इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार

Indurikar Maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे . इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी अगदी थाटामाटात पार पडला. या साखरपुड्याचे फोटो,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. इतरांना अत्यंत साध्या पणाने लग्न करा असा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनीच स्वतःच्या मुलीचा साखरपुडा धुमधडाक्यात केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. शल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले आहेत आणि त्यांनी कीर्तन सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा त्यांचा एक विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे विडिओ मध्ये? Indurikar Maharaj

आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या. पण तिच्या बापाला…मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी केला. Indurikar Maharaj

आता मजा नाही राहिली-

पुढे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले की, “त्याच्यामुळे आता मी कंटाळलो महाराज. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. आणि थांबून घेणार आहे आता.. बास झाली ३१ वर्ष.. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ… माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना.. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही.. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजेत. खरंय की खोटंय? तुम्ही काहीच बोलत नाही.. हे त्याने बंद केलं पाहिजे.. त्याला लाज वाटली पाहिजे, की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता.असे इंदुरीकर महाराज या विडिओ मध्ये बोलताना दिसत आहेत.