हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indusind Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indusind Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे
19 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Indusind Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 19 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, बँक आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांसाठी 3.50% ते 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.00% ते 7.75% पर्यंत व्याजदर देत आहे. 2 वर्षे ते 3 वर्षे आणि 3 महिन्यांच्या FD वर आता सर्वसामान्यांसाठी कमाल 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.25% व्याजदर आहे.
Indusind Bank च्या एफडीचे नवीन दर
Indusind Bank कडून आता 7 ते 30 दिवसांच्या FD वर 3.50%, 31 ते 45 दिवसांच्या FD वर 4.00%, 46 दिवस ते 60 दिवसांच्या FD वर 4.50% आणि 61 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.60% व्याज मिळेल. त्याच प्रमाणे आता बँक 91 ते 120 दिवसांच्या FD वर 4.75%,121 ते 180 दिवसांच्या FD वर 5.00% ,181 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 5.75%, 211 दिवस ते 269 दिवसांच्या FD वर 5.80% ,270 दिवस ते 354 दिवसांच्या FD वर 6.00% व्याज दर ऑफर करत आहे.
तसेच बँक आता 355 दिवस ते 364 दिवसांच्या FD वर 6.25%,1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.00% , 1 वर्ष 6 महिने ते 2 वर्षाच्या FD वर, 7.25% व्याजदर देईल. त्याच प्रमाणे 2 वर्षे ते 3 वर्षे 3 महिन्यांच्या FD वर 7.50%, 3 वर्षे 3 महिने ते 61 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 7.25%, 61 महिने आणि त्याहून जास्त कालावधीच्या FD वर 7.00% व्याजदर देत आहे. याशिवाय, बँक आता इंडस टॅक्स सेव्हर स्कीम (5 वर्षे) वर 7.25% व्याज दर देत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indusind.com/in/en/personal/deposits/fixed-deposit.html
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये