अहमदनगर मध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक नदीत आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। स्त्री जातीचे नवजात अर्भक शहरातील सीना नदीत आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. काही नागरिकांना नदीपात्रात नवजात अर्भक असल्याचे आढळून आले. नागरिकांनी ही माहिती अग्निशामक विभागाला दिली. त्यानंतर अग्निशामक विभागातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी या अर्भकाला बाहेर काढल.

दरम्यान, स्त्री जातीच्या या नवजात अर्भकाला अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्या अर्भकाला तपासून मृत घोषित केलं.

मात्र, हे अर्भक कोणी आणि कधी टाकलं हे अजून पोलिसांना समजलं नाही.या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

इतर काही बातम्या- 

 

 

 

Leave a Comment