अबब! या देशात 7000 रुपयांना मिळतोय अर्धा पाव; सरकारने जारी केली इतकी मोठी नोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । झिम्बाब्वेमध्ये महागाई इतकी वाढली आहे की, सरकारला वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन नोटा जारी कराव्या लागत आहेत. झिम्बाब्वे 100 डॉलर (सुमारे 7500 रुपये) ची नवीन नोट जारी करणार असल्याची नोटीस सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ही झिम्बाब्वेची आतापर्यंतची सर्वोच्च मूल्य असलेली कागदी नोट असेल. मात्र महागाई एवढी आहे की, या नोटेने लोकांना पूर्ण पाव देखील विकत घेता येणार नाही. शंभर डॉलर्समध्ये त्यांना फक्त अर्धाच पाव मिळू शकेल.

AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने अद्याप नोट जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. झिम्बाब्वेच्या या शंभर डॉलर्सची किंमत 0.68 यूएस डॉलर (सुमारे 52 रुपये) असेल. झिम्बाब्वेमध्ये फेब्रुवारी महिन्यात महागाई 66.1 टक्के होती, जी मार्चअखेर 72.7 टक्क्यांवर पोहोचली. आता ती आणखी वर जात आहे.

या महागाईने झिम्बाब्वेतील लोकांच्या जुन्या जखमांना पुन्हा फुंकर घातली गेली आहे. एकेकाळी झिम्बाब्वेमध्ये किंमती प्रचंड वाढल्या होत्या. 2008 मध्ये किंमती इतक्या वाढल्या होत्या की, चलनाचे मूल्य प्रचंड घसरले आणि केंद्रीय बँकेला 100 ट्रिलियन डॉलरच्या नोटा जारी कराव्या लागल्या. आता लोकं हे पैसे छंद म्हणून जमा करतात.

2008 मध्ये, झिम्बाब्वेमध्ये युती सरकार सत्तेवर आले, ज्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक चलन सोडले आणि ग्रीनबॅक (अमेरिकन गृहयुद्धादरम्यान आणीबाणीचे कागदी चलन मानले जाते) आणि दक्षिण आफ्रिकन रँडला स्वीकारले.

मात्र 2019 मध्ये सरकारने पुन्हा एकदा झिम्बाब्वे डॉलर स्वीकारला. तेव्हा सरकारने सांगितले की, एका झिम्बाब्वे डॉलरची किंमत एक यूएस डॉलरच्या बरोबरीची आहे. बुधवारी, एका झिम्बाब्वे डॉलरची किंमत US$145.6 होती तर काळ्या बाजारात त्याची किंमत US$260 होती.रशिया-युक्रेन युद्धामुळे झिम्बाब्वेची महागाई आणखीनच बिकट झाली आहे. हे पाहता देशाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात ऐतिहासिक 80% वाढ केली आहे.