आपण कोणाबद्दल बोलतोय याची तरी समज आली आहे का? मनसेने सुजात आंबेडकरांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकाना दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी ठाकरेंवर पलटवार करत अमित ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी असे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांना कडक शब्दांत फटकारले आहे.

शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटल की, मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…..!!! सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे , तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का….? असे म्हणत जोरदार शब्दांत सुजात आंबेडकर यांचा समाचार घेतला आहे.

सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले-

राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरील वक्तव्यावरून सुजात आंबेडकर यांनी पलटवार करत आधी अमित ठाकरे यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा असे म्हंटल. तसेच मुस्लिम बांधवांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आता आमची आहे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. राजसाहेब तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका”, असंही सुजात आंबेडकर म्हणाले होते.

Leave a Comment