तुम्हाला BSF बद्दलच्या या पाच गोष्टी माहीती आहेत काय?

Story of BSF
Story of BSF
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिनविशेष | सुनिल शेवरे

आज बीएसएफ चा ५४ वा वर्धापन दिन आहे. जगातील महत्वाची आणि मोठी सुरक्षा बल म्हणून बीएसएफ ला ओळखलं जातं. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला तेंव्हा आपल्याकडे बीएसएफ सारखी फक्त सीमा भागात काम करणारी कोणतीच तुकडी नव्हती. ज्या त्या राज्यांची सीमा सुरक्षा ही त्या राज्यांच्या पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. नंतर च्या काळात भारताने सैन्य भरती करून आंतरराष्ट्रीय जाळं मजबूत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

१) “जीवन पर्यंत कर्तव्य” हे बीएसएफ चं ब्रीदवाक्य आहे.

२) बीएसएफ चे आज १८८ बटालियन आहेत.

३) बीएसएफ आज ६,३८५.३६ किमी पर्यंतचा आंतरराष्ट्रीय सीमाभाग सांभाळतं.

४) बीएसएफ चे पहिले प्रमुख म्हणून के. एफ. रुस्तमजी यांनी काम पाहिले.

५) छत्तीसगढ मध्ये २००९ साली राज्यांच्या अंतर्गत समस्येवर उपाय म्हणून बीएसएफ ची टीम तैनात करण्यात आली. तेंव्हापासून त्या राज्याच्या नक्षलप्रभाव जिल्ह्यात बीएसएफ सक्रिय आहे.