हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही वेळापूर्वी ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना परिसरामध्ये प्रकारचा बॉम्ब सापडला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज ठीक साडेबाराच्या दरम्यान ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती इमेलद्वारे देण्यात आली होती. हा ईमेल मिळतात पोलिसांनी स्टाफला बाहेर काढले. तसेच, बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कोड पथकाने तपासणी केली. मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच, कोणताही बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे एका अज्ञात व्यक्तीने हा फेक मेल पाठवल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
दरम्यान, बॉम्ब ठेवण्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क जाती होते. तसेच, आयुक्त, डीएसपी, एसपी सर्वजण घटनास्थळी आले होते. या सर्व प्रकरणामुळे काही वेळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु बॉम्ब शोधक पथकाने परिसराची तपासणी केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे सध्या पोलीस हा मेल कोणी पाठवला? याचा तपास करीत आहेत.