शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सकाळी उधडकीस आला. याची माहिती पोलिसांना त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामही केला. त्यावेळी त्यांना घटनास्थळावर बैलाच्या अंगावर कुर्‍हाडीचे घाव व शेपूट तोडून व फास लावून अमानुष हत्या केल्याचे प्रथमदर्शनी फ्लायला मिळाले. या सर्व प्रकाराबद्दल शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. बैलाच्या अंगावर गुलाल टाकून त्याला निर्दयीपणे फास लावून क्रूरतेने हत्या करणारा अज्ञात नेमका कोण यासंदर्भात आता पोलिसांकडून तपास केला जात आहे.

खिल्लार जातीच्या बैलाची अशा पद्धतीने अमानुष हत्या करण्याचा जावळी तालुक्यातील हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने बैलाची निर्दयी वार करून हत्या करणाऱ्यांचा तात्काळ शोध घ्यावा तसेच तपास करावा, अशी मागणी देखील शेतकरी वर्गाकडून होऊ लागली आहे. या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल घोरपडे करत आहेत.