व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर काळी शाईफेक, पत्रकार परिषदेत राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. बंगळुरू येथे टिकैत यांची पत्रकार परिषद सुरु होती. यावेळी अचानक त्यांच्यावर एका व्यक्तीने काळी शाई फेकली. शाईफेकीच्या घटनेनंतर पत्रकार परिषदेत एकच राडा झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश टिकैत हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. त्यांची एक बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकार परिषदेत कर्नाटक येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कर्नाटक येथील शेतकरी संघटनेचे नेते के चंद्रशेखर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी टिकैत यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी चंद्रशेखर हे माहिती आहे का? असा प्रश्न विचारला.

त्यावेळी त्यांनी चंद्रशेखर यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही,असे उत्तर दिले. नेमके त्याचवेळी चंद्रशेखर यांचे समर्थक आक्रमक झाले. आणि त्यांनी भर पत्रकार परिषदेतच टिकैत यांच्यावर काळी शाहिफेक करण्यात आली. या अचानकपणे घडलेल्या घटनेनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर टिकैत यांच्या समर्थक व इतर दुसऱ्या गटातील समर्थक यांच्यात वादावादी झाली. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांना बेदम मार दिला. दिला. तसेच टिकैत यांच्या समर्थकांनी शाईफेक करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. व त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.