रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा ; मनपा प्रशासकांच्या पोलिसांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात आज शनिवारपासून दोन दिवसाचा लाॅक डाऊन करण्यात आला आहे. या लॉक डाऊनची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध भागात भेटी देऊन पाहणी केली .यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्यां नागरिकांची चौकशी करा अशा सूचना पाण्डेय यांनी पोलिसांना केल्या.

शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात शनिवार व रविवार या दोन दिवसाचे लाॅकडॉऊन करण्याची घोषणा केली. या लॉक डाऊन ची आज शनिवार पासून अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय ,पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी टीव्ही सेंटर चौक येथे भेट घेऊन लॉक डाऊन ची संयुक्त पाहणी केली.

प्रशासक पाण्डेय यांनी अण्णाभाऊ साठे चौक,आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक सिडको उड्डाणपूल, केंब्रिज चौक येथे भेटी देऊन लाॅकडाऊनची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या आणि उभे राहणाऱ्या नागरिकांची विचारपूस व चौकशी करा, त्यांना समजावून सांगा, त्यामुळे रविवारच्या लाॅक डॉऊनची अधिक चांगली अंमलबजावणी होईल.अशा सूचना दिल्या.तसेच रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व फिरणाऱ्या नागरिकांचे पाण्डेय यांनी समुपदेशन केले. यावेळी मनपा जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment