कौतुकास्पद! ८०० किमी पसरलेल्या २०० बेटांवरील ६९८ भारतीयांना घेऊन INS जलाश्वा मालदीवहून भारताकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । मालदीव येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी घेऊन येण्यासाठी आयएनएस जलाश्वा काळ मालदीवला रवाना झाली होती. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आता आयएनएस जलाश्वा आज माले, मालदीव येथून ६९८ भारतीय नागरिकांना घेऊन परत येण्यासाठी निघाली आहे. मालदीवहून परत आणण्यात आलेल्या ६९८ भारतीय नागरिकांमध्ये १९ गरोदर महिलांचा समावेश आहे. तसेच या जहाजात ५९५ पुरुष आणि १०३ महिला आहेत. अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

मालदीव येथे वास्तव्यास असणाऱ्या एकूण २७,००० भारतीयांनी परत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातील अंदाजे ४५०० भारतीयांना नौदलाकडून परत आणण्यात येणार आहे. मालदीव येथील सदर भारतीय समुदाय सुमारे ८०० कि.मी. मध्ये पसरलेल्या २०० पेक्षा जास्त बेटांवर विस्तारलेला आहे. माले, मालदीव येथे लॉकडाऊन असताना भारतीय नौदलाला सर्व भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, आयएनएस जलाश्वा आणि आयएनएस मगर यांनी एकूण १८००-२००० भारतीयांना मालदीवमधून बाहेर काढले आहे. एकूण ४ यात्रा केल्या जाणार असल्याचे समजत आहे. यातील 2 कोची आणि 2 टूटीकोरिन असे या यात्रांचे ठिकाण राहणार आहे. वैद्यकीय सेवक, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती आणि बेरोजगार अशा नागरिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”