प्रेरणादायी – आजकाल बरेच लोक सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल तपासतात. व्हाट्स अँप वरचे स्टेटस, फेसबुक वरचे अपडेट ते पाहण्यातच आपला सकाळचा वेळ जातो. तसेच प्रत्येक जण सकाळी उठल्यावर दिवसभरातील कामाचा विचार करून आपले काम पूर्ण होईल का नाही याबद्दल नकारात्मक विचार करत बसतात. यामुळे दिवस खराब जातो, मनात नकारात्मक विचार येतात. म्हणूनच आपला वेळ वाया जाऊ नये, दिवस चांगला जावा तसेच यशाचा मार्ग मिळावा यासाठी पुढील गोष्टी करणे महत्वाचे आहे.
१) दिवसाची सुरवात – सकाळी उठल्यावर थोडा वेळ शांत बसा. कोणताही विचार न करता १०-२० मिनिटे मेडिटेशन करा. जर मेडिटेशन जमत नसेल तर थोडा वेळ शांत बसून मेंदू शांत ठेवा, त्यामुळे आकलन क्षमता आणि एकाग्रता वाढू शकण्यास मदत होईल.
२) स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा – आज दिवस भरात ठरविलेली कामे पूर्णच होणार असे ठरवून स्वतःबद्दल सकारात्मक विचार करावा. आजचा दिवस चांगला जाणार तसेच ज्या गोष्टी आपल्याला सध्या करायच्या आहेत याबद्दल सकारात्मक विचार करा, त्यामुळे आपल्यात पॉसिटीव्हिटी निर्माण होईल.
३) ठरविलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्याची कल्पना करा – आपण ज्या गोष्टी ठरविल्यात त्या पूर्ण झाल्यात अशी कल्पना करा. मनात ठरविलेल्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात अशी कल्पना केल्याने आपल्या मनाला आनंद होईल तसेच मनशांती मिळेल आणि मनात ठरविलेली गोष्ट पूर्ण करण्याचा दृष्टीने प्रयत्नाला सुरवात होईल.
४) व्यायाम, योग – सकाळी व्यायाम किंवा योग केल्याने प्रसन्न वाटते. शारीर सुदृढ असेल तर बौद्धिक क्षमता वाढते. शरीर कमजोर असेल तर सतत चिडचिड, राग येण्यास सुरवात होते म्हणून शारीरिक स्वस्थ जाणे महत्वाचे आहे. शरीर सुदृढ मिळालेल्या यशाचा उपभोग घेता येऊ शकतो.
५) वाचन – वाचन केल्यानं बौद्धिक क्षमता वाढते. नवीन कल्पना समजतात तसेच जगातील घडामोडी समजण्यास मदत होते. थोर व्यक्तींच्या जीवन प्रवास समजतो त्यातून आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी होण्यास मदत होईल.
६) लेखन – आपल्याला आलेले अनुभव आणि आपले ध्येय लिहून ठेवल्क्याने त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तसेच कामाची विभागणी करण्यास मदत होते. लिहून ठेवलेले सतत वाचनात येईल आणि त्यातून आपल्याला काम करण्याची इच्छा होईल.