मागील वर्षीचा मृग बहार फळबाग विमा त्वरित जमा करा; दिनेश पाटेकर यांची जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मागील वर्षी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग विमा भरलेला होता परंतु फळबाग विमा भरण्याची दुसरी तारीख जाहीर झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा परतावा मिळालेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या यातना निवेदनामार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे मांडल्या.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला असताना. त्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले खरीप हंगामाच्या पीकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. तरीही खरीप हंगामाचा विमा परतावा विमा कंपन्यांनी थातूर-मातूर प्रमाणात देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. एवढं सगळं पाणी डोक्यावरून गेल्यावरही विमा कंपन्यांनी मागील वर्षाचा मृगबहार फळबाग विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही. त्याउलट कंपन्यांनी यावर्षीचा फळबाग विमा भरण्याची तारीख जाहीर केली.

दरम्यान, विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांत कमालीची अस्वस्थता पसरली असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कृषीप्रधान देशात प्रत्येक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो ही खुप मोठी शोकांतिका आहे. यासंदर्भात कृषी विभागाने लक्ष वेधून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने फळबाग पिकविम्याचा परतावा जमा करावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पाटेकर यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटून दिलेल्या निवेदनातून नुकतीच केली आहे.

Leave a Comment