तांबवेत ग्रामपंचायत आणि युवकांच्या पुढाकारातून संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तांबवे ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष उभारले असून त्यास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे.

या विलगीकरणासाठी गावातील युवकांनी पुढाकार परिसर स्वच्छता तसेच साहित्याची उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जि.प. शाळेतील शिक्षकांनी विलगीकरण कक्षाच्या मदतीसाठी ३ हजार ५०० रुपयांची देणगी सरपंच सौ.शोभाताई शिंदे यांचेकडे सुपूर्द केली आहे. तांबवेचे सुपुत्र पोपटराव पाटील यांनीही कक्षास ७ हजार ५०० रूपयांच्या साहीत्यांची मदत केली आहे. तर शहीद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानकडून ॲमब्युलन्स 24 तास सेवेसाठी देण्यात आलेली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी टि. एल. चव्हाण, तलाठी श्री. ढवणे, पोलिस पाटील पवन गुरव, मुख्याध्यापिका सौ.नलवडे, सतिश पाटील, यशवंत पाटील, काकासाहेब पाटील, वैभव शिंदे, संजय राऊत, डॉक्टर श्री. संदे, अशरफ मुल्ला, समीर नदाफ उपस्थित होते.

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी

तांबवे गावात सर्वधर्मीय एकसंधपणे राहत असतात. गावातील मुस्लिम समाजानेही सामाजिक बांधिलकीतून ग्रामपंचायतीचे वतीने उभारण्यात येत असलेल्या कोरोना (कोविड19) विलगीकरण कक्षात असणाऱ्या पेशंटना रोज सकाळी नाश्ता (दूध आणि दोन अंडी) अशी मदत करणार आहेत.