कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावांच्या व वाडयावस्त्यांकरीता राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूरीकरीता सादर करण्याच्या सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला केल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांमध्ये पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून पावसाळयामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी भागामधील अनेक गावांच्या व वाडया वस्त्यांकरीता अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले. तर काही गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय व नादुरुस्त झालेल्या आहेत. पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये पाटण तालुक्यातील काळोली, सडानिनाई (सडावाघापूर), चाफळ, जंगलवाडी (जाधववाडी चाफळ), पाडळोशी,तावरेवाडी (पाडळोशी), मसुगडेवाडी(पाडळोशी), बोर्गेवाडी (घोट), फडतरवाडी (घोट), नुने, पांढरेपाणी (आटोली), आटोली, गव्हाणवाडी, बेंदवाडी माळवाडी सवारवाडी कडवे, धामणी, रुवले, मरळोशी, लोटलेवाडी (काळगावं), काळगावं, डाकेवाडी (वाझोली), शिद्रुकवाडी (काढणे), पाळशी, लोहारवाडी (काळगावं), कामरगावं, मानाईनगर, आवसरी (काठी), पाचगणी, काहिर, कडवे खुर्द रेडेवाडी, डोणीचावाडा (वांझोळे), नहिंबे चिरंबे, ताईगडेवाडी तळमावले, भारसाखळे, विठ्ठलवाडी (शिरळ), करपेवाडी (काळगावं), जळव,कातवडी, येराडवाडी, सदुवर्पेवाडी चेणगेवाडी सळवे, चाळकेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), ठोमसे, मारुल तर्फ पाटण, आडूळ, निगडे, पाचुपतेवाडी ग्रा.पं., आंबवडे खुर्द, भिकाडी मिसाळवाडी धनगरवाडा (मरड) व मसुगडेवाडी दाढोली तर सुपने मंडलातील आबईचीवाडी, गमेवाडी, केसे, बेलदरे, साजूर, उत्तर तांबवे, वस्ती साकुर्डी, पश्चिम सुपने, आरेवाडी, पाडळी (केसे), डेळेवाडी अशा 61 योजनांचा गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.