‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.

मात्र मशीन असून सुद्धा काम संथगतीने चालू होते असल्यामुळे मतदान रात्री आडेआठ पर्यत चालले. त्यामुळे मतदारांना रात्रीपर्यंत रांगेत उभा राहण्याचा मनस्ताप झाला. सकाळ पासून पडणारा रिमझिम पाऊस आणि ग्रामीण भागातील मंडळी शेतात असल्याने बऱ्याच ग्रामस्थांनी दुपार नंतर मतदान करण्यासाठी गर्दी केली. मात्र जास्त मतदार असल्यामुळे व्हीव्हीपॅट संख्या कमी पडत होती. दरम्यान मतदारांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी केल्याने सर्वांनाच मतदानासाठी वेळ झाला. परभणी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये मिळून १३ लाख ९९ हजार ५६२ एवढे मतदार आहेत. यापैकी संध्याकाळी उशिरापर्यंत साडेनऊ लाख लाखाहून अधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ६६.२७ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान जिंतूर मध्ये ७२ टक्के झाले असून सर्वात कमी मतदान परभणी विधानसभा मतदारसंघात ६०.९२ टक्के एवढे झाले आहे. याशिवाय गंगाखेड मतदारसंघात ६३.२९ तर पाथरी विधानसभेत ६८.५० टक्के मतदान नोंदविण्यात आले.

Leave a Comment