साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.

‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या घटना मतदानादिवशी उघडकीस आल्या आहेत. कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला राग सातारा जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्यावर काढला आहे. तुम्ही मोदी-शहांचं कंत्राट घेऊन काम करता का? अशा शब्दांत नागरिकांनी मोनिका सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. साताऱ्यातील नवलेवाडी येथे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.

बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही मतदानकर्त्यांनी मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून याकडे निवडणूक विभागाचं किती दुर्लक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.

बिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल

मतदान केंद्रावर होमगार्डला शिवीगाळ केल्याप्रकरणी बिगबाॅस फेम अभिजीत बिचुकलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. अभिजीत बिचुकले जावळी विधानसभा आणि वरळी विधानसभेचे अपक्ष उमेदवार आहेत.

‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.

कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ !

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणूकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

मतदान केंद्रावर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्याचा राडा; ईव्हीएमवर शाई फेकत दिल्या घोषणा

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

साताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच; घटलेल्या मतदानाचा अर्थ काय?

सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ४ वाजेपर्यंत ४८.४५ टक्के मतदान झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली,कोरेगाव,खंडाळा,कराड उत्तर,कराड दक्षिण, फलटण, माण-खटाव आणि पाटण या ८ मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानातून ही सरासरी काढण्यात आली आहे. आजच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होती. मतदार पुनर्रचनेत फलटण आणि माण-खटाव हे दोन मतदारसंघ माढा लोकसभेत गेल्याने उर्वरित ६ मतदारसंघातील नागरिकांनी लोकसभेच्या जागेसाठीही मतदान केलं.