Interest Rate Cut : BOI-PNB सह ‘या’ बँकांचे व्याजदर झाले स्वस्त

Interest Rate Cut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Interest Rate Cut। बँकेतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक सह ४ बँकांनी आपल्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. काल६ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातील बँकांनी आपल्या कर्जावरील व्याज ऑटोमॅटिक कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बँकेकडून नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1) बँक ऑफ इंडिया –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर बँक ऑफ इंडिया या देशातील आघाडीच्या राष्ट्रीय बँकेनेही आपल्या व्याजाचे दर कमी केले.याबाबत बँक ऑफ इंडियाने शेअर मार्केटला माहिती देत म्हंटल कि, रेपो आधारित लँडिंग दरांमध्ये बदल करत RBLR रेट ८.८५ टक्क्यांवरून ८.३५ टक्के करण्यात आला आहे.

2) पंजाब नॅशनल बँक –

पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) सुद्धा त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. पीएनबीनेही रेपो लिंक्ड लँडिंग दर कमी करत ८.८५ टक्क्यांवरून ८.३५ टक्क्यांवर आणले आहेत. मात्र MCLR आणि बेस रेट मध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

3) युको बँक

रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर युको बँकेने MCLR वर आधारित कर्जे स्वस्त केली आहेत. बँकेने जवळजवळ सर्व कालावधीसाठी ०.१०% म्हणजेच १० बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. येत्या १० जून २०२५ पासून नवीन दर लागू होतील. याचा फायदा नव्या आणि जुन्या अशा दोन्ही कर्ज ग्राहकांना मिळू शकेल.

4) करूर वैश्य बँक –

यापूर्वी, करूर वैश्य बँकेने शुक्रवारी MCLR रेट मध्ये कपात करण्याची (Interest Rate Cut) घोषणा केली. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ६ महिन्यांचा MCLR आणि १२ महिन्यांचा MCLR कमी करण्यात आला आहे. ६ महिन्यांचा MCLR ९.९ टक्क्यांवरून ९.८ टक्के करण्यात आला आहे. तर १ वर्षाचा MCLR १० टक्क्यांवरून ९.८ टक्के करण्यात आला आहे.

5) इंडियन बँक

आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर इंडियन बँकेनेही त्यांच्या कर्जावरील व्याजदर (Interest Rate Cut) कमी केले आहेत. इंडियन बँकेने रेपो लिंक्ड बेंचमार्क लँडिंग दर (RBLR) ८.७ टक्क्यांवरून ८.२ टक्के केला आहे. हे नवीन दर ९ जून २०२५ पासून लागू होतील.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने कालच्या चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंन्तर रेपो रेट मध्ये तब्बल 0.50 टक्क्यांची कपात केली. यापूर्वी रेपो रेट ६ टक्क्यांवर होता, तो आता ५.५० टक्क्यांवर आला आहे. यावर्षी रेपो रेट मध्ये तिसऱ्यांदा कपात (Repo Rate Cut) झाली आहे. यापूर्वी, फेब्रुवारी आणि एप्रिलच्या चलनविषयक धोरण आढाव्यात, आरबीआयने रेपो रेट मध्ये २५-२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. यावर्षी जवळपास १०० बेसिस पॉईंट ने रेपो रेट कमी झाला आहे. त्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा हप्ता, कार लोन किंवा इतर कोणतेही EMI आता कमी होतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा झालाय.