Interesting Facts : जगभरात मोजता येणार नाहीत इतके लोक विमानाने प्रवास करीत असतात. विमान हे असे दळणवळणाचे साधन आहे ज्यामुळे वेळ वाचतो आणि आरामदायी प्रवास सुद्धा घडतो. देशांतर्गत आणि देशाबाहेर वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला पसंती दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ? विमान बहुतांशी समुद्रावरुनच का उडते ? विशेषतः देशाबाहेरील प्रवास करताना याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. चला तर मग जाणून घेऊया…
खरेतर Quora या वेबसाईटवर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता ज्याचे उत्तर एका एव्हिएशन तज्ज्ञाने दिले आहे.
- समुद्रावरचा प्रवास हा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि विमानाच्या (Interesting Facts) कार्यक्षमतेसाठी चांगला असतो.
- विमाने अनेकदा “ग्रेट सर्कल” मार्गाने उड्डाण करतात.समुद्रावरचा प्रवास हा त्यापैकीच एक असत. दिसताना समतल विमान प्रवास दिसत असला तरी तो ग्रेट सर्कल वर असतो.
- ग्रेट सर्कल मार्ग निवडल्याने वेळ आणि इंधनाची बचत होते.आंतर कमी होते.
- समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान एक आहे. समुद्रावरील हवा जमिनीपेक्षा कमी अशांत असते. त्यामुळे इथे विमान अडकण्याची शक्यता खूपच कमी होते.
विमान हिमालयावरून का उडत नाही ? (Interesting Facts)
विमान हिमालय आणि प्रशांत महासागरावरून का उडत नाही? त्यामागचं कारण आहे विमानासाठी धोका. साधारणपणे कोणतेही विमान हवेत 30 हजार फूट उंचीवर उडते. हिमालयाची शिखरे 20 हजार फूट उंच आहेत. त्यामुळे हवामानात काही बिघाड झाला आणि विमान खाली घ्यावा लागला तर मात्र या शिखरांशी टक्कर होण्याचा धोका असतो. शिवाय या भागांमध्ये येथे वाऱ्याचा वेग असामान्य आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे समस्या उद्भवतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भागात जलवाहतूक नगण्य आहे. त्यामुळे अपातकालिन परिस्थीतीत मदत मिळणेही शक्य होणार नाही.
काय मग मिळालं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर ? त्यामुळे पुढे जेव्हा केव्ह तुम्ही समुद्रावरून (Interesting Facts) विमानप्रवास कराल तेव्हा सुंदर दृश्य बघण्याखेरीज याचा देखील विचार करा.