हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ या सिजनमधला अत्यंत प्रतिभावान स्पर्धक गायक म्हणजे नचिकेत लेले. खरतर नचिकेतला आणि त्याच्या कलेला इंडियन आयडॉल १२ च्या माध्यमातूनच खरी प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये असताना त्याने नेहमीच एकापेक्षा एक सरस आणि धमाकेदार परफॉर्मन्स त्याच्या मराठमोळ्या अंदाजात दिले आहेत. यामुळे बघता बघता नचिकेतच्या फॅन फॉलोईंग जबरदस्त वाढली. या शोमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र त्याचे एलिमिनेशन झाले आणि प्रेक्षकांनी नाराजीचा सूर धरला. मात्र नचिकेत आजही आपल्या चाहत्यांना नाराज होऊन देत नाही. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो ओह मेरी जान हे गाणे गाताना दिसतोय. बस्स.. ईतनाही काफी है.. चाहत्यांनी हा व्हिडीओ अगदी डोक्यावर उचलून घेत वायरल केला आहे.
https://www.instagram.com/p/CPI-m7OjR-v/?utm_source=ig_web_copy_link
नचिकेत लेलेला शोमधून एलिमिनेट केल्यामुळे रसिकांनी अत्यंत नाराजी व्यक्त केली होती. नचिकेत शोमधून निश्चितच बाहेर पडला मात्र आजही सोशल मीडियावर गाण्यांच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतो. त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास नचिकेतचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील.
https://www.instagram.com/p/CO5mHcaD0kv/?utm_source=ig_web_copy_link
यापैकीच नचिकेतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. यामध्ये तो ‘लाईफ इन ए मेट्रो’ सिनेमातील’ ओह मेरी जान’ हे गाणं त्याच्या सुरेल आवाजात गात आहे. हे गाणे ऐकताना सोप्पे वाटत असले तरी अगदीच कठीण आहे. मात्र तरीही नचिकेत इतक्या सहजतेने ते गाताना दिसतोय आणि ते हि अप्रतिम. त्यामुळे या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/p/CNZ74SfDpHF/?utm_source=ig_web_copy_link
मूळचा कल्याणवासी असणारा नचिकेत लेले आज इंटरनॅशनल क्रश होण्याच्या मार्गावर आहे. त्याची आणि त्याच्या गायनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातच नाही तर सातासमुद्रापारही त्याची लोकप्रियता आहे. त्यामुळे ‘इंटरनेशनल क्रश’ असेही नचिकेतला म्हटले जात आहे.
https://www.instagram.com/p/COruAl7Do3k/?utm_source=ig_web_copy_link
आज भले इंडियन आयडॉल शोमधून तो बाहेर असेल पण तरीही नचिकेतची जादू कायम आहे. नचिकतचे गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकुळ घालत असतात. शो दरम्यान नचिकेतने ‘एक चतुर नार’ हे गाणं अश्या पद्धतीने गायलं होतं, कि त्याच्यासारखं कोणीच गाऊ शकणार नाही, असे म्हणत कित्येकी चाहते आजही हा व्हिडीओ शेअर करतात.