कराची | ‘पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू, हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जावं शाहिद झाले. यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका सुरु होती; यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली.
भारत सरकार कोणत्याही पुराव्याविना पाकिस्तानवर आरोप करीत आहे.पाकिस्तान असे का करेल, आम्हाला याचा काय फायदा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘जर भारत सरकारने आम्हाला पुरावे दिले तर आम्ही चौकशी करायला तयार आहोत ‘ असे त्यांनीं म्हटले आहे. आम्हाला दहशतवादचा कोणताच फायदा नाही, गेली १५ वर्ष आम्ही दहशतवादविरोधी लढाई लढत आहोत.चौकशी आणि दशतवादविरोधी चर्चेसाठी आम्ही तयार आहोत.
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतल्यावर भारताने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला.तसेच पाकिस्तानवर २०० टक्के कर लावला आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्यासाठी भारताने तयारी केली आहे. अमेरिका, जर्मनीसह अनेक मोठया देशांशी दहशतवादाविरोधात एकत्र येण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी चर्चा सुरु आहे.
इतर महत्वाचे –
व्हिएन्ना कराराच्या अटींवरून पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न