International Yoga Day 2024 | हृदयाच्या आरोग्यांसाठी करा ‘ही’ 5 योगासने; हे आजारही होतील दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

International Yoga Day 2024 | दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. आज संपूर्ण भारतात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. शतकानुशतकापासून भारतात योगासनाला खूप जास्त महत्त्व आहे. योगामुळे आपल्या आरोग्याला खूप जास्त फायदे होतात. त्यामुळे योगासनाचे आपले आयुष्यातील महत्त्व समजून सांगण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. योगासनामुळे आपल्या शरीराला त्याचप्रमाणे मनशांती देखील मिळते. त्याचप्रमाणे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यापासून योगाची मदत होते. आता आपण काही योगासनांबद्दल (International Yoga Day 2024) जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आपल्या हृदयाला खूप जास्त फायदे होतात.

उस्ट्रासन | International Yoga Day 2024

उस्ट्रासनामुळे रक्ताभिसरण सुधारते. या कारणास्तव ते हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, तुम्हाला आधीच हृदयविकार असल्यास हे आसन करू नका. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर उभे राहा आणि हातांनी कमरेला आधार देत मागे वळा. काही सेकंद या आसनात राहा आणि नंतर आराम करा.

त्रिकोनासन

या आसनाच्या मदतीने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे हे आसन करण्यासाठी दोन पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे रहा. आपला उजवा पाय बाहेर वळवून आणि हळू हळू त्याकडे झुकून प्रारंभ करा. आता तुमच्या उजव्या हाताने तुमच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करा आणि डावा हात सरळ वरच्या दिशेने ठेवा. काही सेकंद या आसनात राहा आणि नंतर आराम करा.

भुजंगासन

भुजंगासनामुळे रक्तप्रवाह देखील सुधारतो, जो हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपा आणि हातांच्या साहाय्याने शरीराचा पुढचा भाग उचलून मागे वाकवा. काही सेकंद या आसनात राहिल्यानंतर आराम करा.

ताडासन

ताडासन केल्याने तुमचे संपूर्ण शरीर ताणले जाते. याशिवाय शरीरातील रक्तप्रवाहही सुधारतो आणि तणावही कमी होतो. हे आसन करण्यासाठी पायांवर सरळ उभे राहून दोन्ही हात वर करून स्वत:ला वर खेचा. यासाठी तुमची बोटे एकत्र जोडून स्वतःला वरच्या बाजूस स्ट्रेच करा.

विरभद्रासन | International Yoga Day 2024

या आसनाच्या मदतीने रक्ताभिसरण सुधारते आणि तणावही कमी होतो. त्यामुळे हे आसन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी उजवा पाय पुढे वाढवा आणि गुडघा वाकवून पुढे वाकून दोन्ही हात जोडून घ्या. काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर आराम करा.