Internet : नेटवर्कवर आल्यानंतरही इंटरनेट चालत नाही? मोबाईलमध्ये करा ‘हे’ बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात इंटरनेट (Internet) खूप महत्वाचे बनले आहे. इंटरनेटद्वारे अनके कामे एका क्लीकद्वारे अगदी सहजरित्या केली जातात. आणि अशातच जर इंटरनेट बंद झाले तर… असा विचार जरी मनात आला तरी अगदी धस्स होते. सध्या इंटरनेटच्या स्पीडबाबत अनेक अडचणी येत आहेत. अनेक वेळा मोबाईल नेटवर्क व्यवस्थित असल्यानंतरही इंटरनेटचा स्पीड खूप कमी होतो किंवा नसतो. मात्र काही सोप्या स्टेप्स वापरून आपण ते ठीक करू शकतो. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

मोबाईल डेटा रीस्टार्ट करा-

अँड्रॉइड असो वा आयफोन प्रत्येक फोनमध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. म्हणून इंटरनेट (Internet) जेव्हा काम करत नसेल तेव्हा मोबाइल डेटा रीस्टार्ट करा. याचा अर्थ असा कि पहिले मोबाइल डेटा बंद करा आणि नंतर मोबाइल डेटा चालू करा. यानंतर तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट रिफ्रेश होईल आणि ते व्यवस्थित चालेल.

Cache क्लिअर करा-

फोनचा ब्राउझर सारखा वापरल्यानंतर वेबसाइटचा डेटा कॅशेमध्ये स्टोर केला जातो. त्यामुळे एखादी वेबसाइट सारखी वापरली गेली तर ब्राउझरचा स्पीड कमी होतो. म्हणूनच वेळोवेळी कॅशे क्लिअर करा. यामुळे फोन आणि इंटरनेट (Internet) दोन्हीचा स्पीड वाढेल. इंटरनेटच्या स्पीडसाठी मुख्यतः फोनचे नेटवर्क कारणीभूत असले तरी काहीवेळा फोनचे इंटर्नल सॉफ्टवेअरही ते वाढवण्यात मदत करते.

फोन एअरप्लेन मोडवर टाका –

सतत इंटरनेट (Internet) कनेक्शन मिळत नसेल तर मोबाईलचे एअरप्लेन मोड वापरता येईल. मोबाईल या मोडवर टाकल्यानंतर कोणाचाही फोन येणार नाही. म्हणूनच जेव्हा फोन या मोडवर ठेवाल तेव्हा सर्वांत आधी महत्वाची कामे उरकून घ्या. काही वेळ या मोडवर फोन ठेवल्यानंतर फोनचा एअरप्लेन मोड बंद करा. यामुळे फोनचे नेटवर्क रिफ्रेश होईल आणि नेटवर्कसोबत मोबाईलच्या इंटरनेटलाही स्पीड मिळेल.

हे पण वाचा :

Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Leave a Comment