नवी दिल्ली | सध्याच्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर करत मोदी सरकारकडून शेतकर्यांची मुस्कटदावी केली जात आहे.
Internet services snapped in some parts of Delhi-NCR in view of the prevailing law and order situation. pic.twitter.com/5rcHwb27qY
— ANI (@ANI) January 26, 2021
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील नागरिकांचे लक्ष वेधून केंद्रीय कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज शेतकर्यांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. यामध्ये काही ठिकाणी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. काही लोकांनी (ते शेतकरी आंदोलनाशी संलग्नित आहेत का याची पुष्टी नाही) लाल किल्ल्यामध्ये झेंडा फडकवला. आता यापार्श्वभुमीवर मोदी सरकारकडून दिल्ली शहरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाला मलिन करण्याचा कट काही जणांनी रचला आहे. आंदोलनात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांना आम्ही ओळखतो. काही राजकीय पक्षांचे लोक आंदोलनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं वक्तव्य टिकैट यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.