#internetshutdown : CNN, न्यूयॉर्क टाइम्स, अमेझॉनसह दिग्गज कंपन्यांच्या वेबसाईट बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: जगभरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक साईट्स डाऊन झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, द गार्डियन या आणि इतरही अंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईटचा समावेश आहे. आता ही समस्या कशामुळे निर्माण झाली आहे? तर प्राथमिक माहिती मधून असे समजते आहे की CDN म्हणजेच कन्टेन्ट डिलेवरी नेटवर्कमधील काही तांत्रिक कारणांमुळे ही अडचण निर्माण होऊन या साईट बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे या वेबसाईट प्रामुख्याने अमेरिकेमधल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर ‘आम्ही तांत्रिक अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत काही वेळाने प्रयत्न करा ‘असा संदेश म्हणजेच येतो आहे. तर इतर साईट वर फक्त तांत्रिक अडचण इतकाच संदेश येतो आहे. ज्या साईट्स डाउन झाल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने न्युज वेबसाईटचा समावेश आहे. यामध्ये बीबीसी, द न्यूयॉर्क टाईम्स, सी एन एन आणि द गार्डियन यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यूज साईटचा समावेश आहे. या साईट उघडल्या असता युजर्सना एरर असा मेसेज पाहायला मिळाला. या न्यूज वेबसाइट्स सोबतच इतरही अनेक साइट जसे की प्रिंटरेस्ट, रेडइट, ट्वीच, स्पोटिफाय ,अमेझॉन यादेखील बंद पडल्या होत्या. यातील काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागले आहेत. मात्र काही साईट्स अजूनही बंद आहेत.

सायबर अटॅकची माहिती नाही

CDN हे एक प्रॉक्सी सर्वरच नेटवर्क आहे आणि त्याचे डेटा सेंटर्स हे विस्तृत क्षेत्रामध्ये वितरित केले जातात. या कंपन्या कार्यक्षमता आणि वेब सर्विसेस ची उपलब्धता सुधारण्यासाठी ग्लोबल सर्वोच्च नेटवर्क चालवतात. त्यांनी याबाबत म्हटले आहे की या समस्येला दूर करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या स्टेजमध्ये अद्याप तरी कसल्याही सायबर अटॅक ची माहिती समोर आली नाहीये या घटनेनंतर ट्विटर वर मात्र #internetshutdown ट्रेंड करत आहे.

Leave a Comment