कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर 50 वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. दीर्घ राजकीय परंपरा असलेल्या चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण यांची निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या भूषविल्यानंतर एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी पडली आणि ती त्यांनी निष्टेने पार पाडत कर्तृत्व सिद्ध केले. चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच आपले होम टाऊन असलेल्या कराडच्या विकासावर निधीची बरसात केली. त्यामुळे कराड तालुक्यात विकासकामांचा धुमधडाका सुरु आहे. पृथ्वीराज बाबा फक्त निधी देऊन थांबले नाहीत, तर ती कामे सुरु करून पूर्णत्वास नेऊन ती कामे प्रत्यक्षात साकारली. यालाच म्हणतात वचनपूर्ती! 1 हजार 800 कोटी इतका भरघोस निधी केवळ कराड तालुक्याच्या विकासासाठी दिला. या निधीतून सुरु झालेल्या आणि सुरु असलेल्या कामांमुळे कराडची वाटचाल जिल्हा निर्मितीकडे सुरु झाली आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा पृथ्वीराज बाबांचा विकासकामांचा धडाका असाच सुरु आहे.
कराड म्हटले कि स्व. यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ आठवतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात कराडला विकासाची दिशा दाखविली. चव्हाण साहेबांनी विकासाचा पाया रचला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर कळस चढविला. उच्च विद्याविभूषित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या शालेय दशेतील शिक्षणाची परिस्थिती आणि आजचा स्पर्धात्मक काळ यामधील दरी ज्ञात होती. हि दरी भरून काढण्यासाठी काय करायला हवे याची त्यांना जाणीव होती. तसेच एखाद्या प्रदेशाची चौफेर भरभराट होण्यासाठी काय-काय सुविधा हव्यात याचा अभ्यासही होता. म्हणून सर्वप्रथम त्यांनी सुसज्ज विमानतळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भूकंप संशोधन केंद्र यांसारख्या कामांना प्राधान्य दिले. या शास्त्रोक्त कामांमुळे कराडची ओळख आणि नोंद देशाच्या नकाशावर झाली.
सातारा जिल्हा आणि कराड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पृथ्वीराज चव्हाण कार्यरत राहिले. त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या चार वर्षात ठळकपणे दिसून येतोय.
चव्हाण कुटुंबियांना पन्नास वर्षांची दीर्घ राजकीय परंपरा आहे. कराड लोकसभा मतदार संघात या कुटुंबाचा राजकीय दबदबा राहिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, मातोश्री स्व. प्रेमालाकाकी चव्हाण या दाम्पत्याने कराड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. 1991 साली स्व. राजीव गांधींच्या आग्रहास्तव पृथ्वीराज चव्हाण यांना राजकारणात यावे लागले. जगात माहिती-तंत्रज्ञानाचा उगम होत असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे तंत्रज्ञ राजकारणात यावेत असा राजीव गांधींचा विचार आणि प्रयत्न होता. म्हणूनच पृथ्वीराजबाबांना त्यांची इच्छा आणि आग्रह डावलता आला नाही. नवखे असूनही कराडकरांनी चव्हाण कुटुंबावरील प्रेम, श्रद्धा आणि निष्टेमुळे पृथ्वीराज बाबांना लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. तीनवेळा कराडकरांनी त्यांना लोकसभेत नेतृत्वाची संधी दिली. मध्यंतरी पृथ्वीराज बाबांना पक्ष नेतृत्वानेही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, काँग्रेसचे सरचिटणीस आणि विविध राज्यांच्या निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. या सर्व जबाबदाऱ्या बाबांनी निष्ठापूर्वक आणि इमाने इतबारे पार पाडल्या.
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी यांना वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! @prithvrj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 17, 2022
कराडसाठी भरभरून निधी…
मुख्यंमत्री असताना आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा बाबांनी कराडच्या विकासाचा रथ पुढेच आणला आहे. मुख्यंमत्री असताना जी विकासकामे कराडला केली त्यामुळे कराडची जिल्हा होण्याकडे वाटचाल सुरु झाली. आणि या विकासकामामुळेच कराडची विकासात्मक अशी ओळख निर्माण झाली. यामधीलच महत्वाची विकासकामे…..
– स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे सुशोभीकरण, संरक्षक भिंतीसाठी भरीव निधी
– कराड शहराच्या हद्दवाढीचा ऐतिहासिक निर्णय
– कराडला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण व चौपदीकरणामुळे दळणवळण वाढणार
– आगाशिव डोंगराचा पर्यटन विकास
– कराड उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालय मंजुरीसह नवीन इमारतीचे काम पूर्ण
– 550 कोटी रुपयांचे भूकंप संशीधन केंद्र
– शासकीय कृषी महाविद्यालयामुळे शैक्षणिक क्रांती
– प्रशासकीय इमारतीमुळे कराडची जिल्ह्याकडे वाटचाल
– यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनासाठी भरीव निधी
– पोलिसांसाठी दर्जेदार गृहसंकुल पूर्ण
– नवीन विश्रामगृहासाठी भरीव निधी, काम पूर्णत्वाकडे
– दिवाणी, सत्र न्यायालयाची नवीन इमारत पूर्ण
– स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा मेकओव्हर
– शनिवार पेठेत बहुमजली प्रशासकीय इमारतीसाठी निधी
– कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका रस्त्यासाठी 11 कोटींचा निधी
– कराड हद्द वाढीतील भागाच्या विकासासाठी 8 कोटींचा निधी
– कोल्हापूर नाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण कमानीसाठी 55 लाखांचा निधी, काम पूर्ण
– ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयलँडसाठी 45 लाखांचा निधी