हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या विमा योजना चालवल्या जातात. या भागात, एलआयसीने महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन LIC Aadhar Shila Scheme सुरू केली होती. हे लक्षात घ्या कि, 8 ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना एलआयसीच्या या योजनेचा लाभ घेता येईल.
‘या’ पॉलिसी विषयी जाणून घ्या
या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक फायदे दिले जातात. यामध्ये कोणत्याही महिलेला कमीत कमी 75 हजार रुपये तर जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचा विमा खरेदी करता येईल. LIC च्या या योजनेअंतर्गत तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावरही गुंतवणूक करता येईल. तसेच या योजनेअंतर्गत, कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षे गुंतवणूक करता येईल. जर आपण 20 वर्षे दर महिना 899 रुपये (दररोज सुमारे 29 रुपये) जमा केले तर पहिल्या वर्षी आपले फक्त 10,959 रुपये जमा होतील. तसेच यावर 4.5 टक्के टॅक्स देखील भरावा लागेल.
अशा प्रकारे मिळेल मोठा रिटर्न
जर आपण 20 वर्षांसाठी दरमहा 899 रुपये जमा केले तर 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ज्यामध्ये पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. अशा प्रकारे यामध्ये गुंतवणूक करून महिलांना त्यांचे भविष्य सुरक्षित करता येईल. तसेच 20 वर्षांनंतर त्यांना मोठी रक्कम देखील मिळेल.
कोणा-कोणाला फायदा मिळू शकेल ???
LIC च्या आधारशिला योजनेद्वारे सुरक्षा आणि बचत दोन्ही मिळते. इथे हे लक्षात घ्या कि, ज्या महिलांकडे आधार कार्ड असेच अशा महिलांनाच याचा लाभ घेता येईल. एलआयसीच्या या योजनेद्वारे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील मिळते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LICs_Aadhaar_Shila
हे पण वाचा :
3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये मिळवण्याची संधी !!!
Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!
Stock Market : येत्या आठवडय़ात ‘हे’ घटक ठरवतील शेअर बाजाराची दिशा !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!
Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!