पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के व्याजदरासह मिळतील अनेक फायदे

India-Post
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टाच्या अनेक बचत योजना या सुरक्षित आणि चांगला परतावा देतात त्यामुळे सामान्य लोक या योजनांकडे अधिक आकर्षित होतात. सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांचा व्याजदर अधिक असतो तसेच हि गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. आता अशाच योजनेबद्दल जाणून घेऊया.

पोस्टाची रिकरिंग योजना
या योजनेमध्ये लोक १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये दरमहा दहा हजार रुपये १० वर्षांसाठी गुंतवल्यास १६ लाख रुपये मिळू शकतात. तसेच या योजनेवर ५.८ टक्के व्याज मिळत आहे. दरमहा १० हजार याप्रमाणे तुमची १० वर्षात १२ लाख गुंतवणूक होईल त्यावर ५.८ टक्के व्याजदराने ४ लाख २८ हजार रुपये व्याज मिळेल. त्यामुळे तुम्हाला या योजनेची मुदत संपल्यानंतर १६ लाख २८ हजार मिळतील. सध्याच्या काळात सगळ्या बँकेचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिक व्याजदर देणारी ही योजना खूप फायदेशीर आहे.

रिकरिंग योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
१. या योजनेत सिंगल किंवा जॉईन्ट खाते खोलू शकता. जॉईन्ट खात्यात 3 लोकांची नावे टाकू शकता.

२. हे खाते १० वर्षांच्या पुढील मुलाच्या नावावरसुद्धा खोलता येऊ शकते.

३. या योजनेची मुदत ५ वर्षे आहे. त्यानंतर अर्ज करून ती आणखी ५ वर्षे वाढवता येऊ शकते.

४. या खात्यात दरमहा किमान १०० रुपये जमा करावे लागतात. वेळेत पैसे जमा न केल्यास १०० रुपयांवर १ रुपया दंड भरावा लागेल.

५. खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनतर मुदतीच्या आधीच बंददेखील करता येते.

६. दर तीन महिन्यांनी या योजनेच्या व्याजदराचा आढावा घेण्यात येतो.

७. ही योजना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरीत देखील करता येते.

८. या योजनेतील गुंतवणुकीवर कर्जसुद्धा मिळू शकते. एक वर्षानतर जमा रकमेच्या ५० टक्के रकमेवर एकदाच कर्ज घेता येते.

हि योजना अत्यंत लाभदायी असल्याने यामध्ये प्रत्येकजण दरमहा झेपेल त्याप्रमाणे यात गुंतवणूक करू शकतो. यामध्ये एकाचवेळी मोठी रक्कम भरायची गरज नाही आहे. या योजनेमध्ये किमान १०० व त्यापुढे दहाच्या पटीत पैसे गुंतवता येऊ शकतात. या योजनेत योग्य वेळी गुंतवणूक केल्यास एकरकमी मोठी रक्कम मिळून तुम्ही मुलांचे, शिक्षण, लग्न अशा मोठ्या खर्चांची तरतूद करू शकता. अधिक व्याजदर आणि सुरक्षितता ही या योजनेची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.