नवी दिल्ली । पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणास (Pension Fund Regulatory and Development Authority) महसूल विभागाकडून राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (National Pension System) आणि अटल पेन्शन योजनेच्या (Atal Pension Yojana) ग्राहकांसाठी ई-केवायसी सर्विसेजसाठी मान्यता मिळाली आहे. ई-केवायसी द्वारे अकाउंट उघडण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल.
महसूल विभागाने ई-केवायसीला दिली मान्यता
पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने निवेदनात म्हटले आहे की,”ऑनलाइन ई-केवायसीद्वारे अकाउंट उघडण्याची प्रक्रिया सोपी होईल कारण ग्राहकांना एनपीएस डिजिटल पद्धतीने अवलंब करण्यास मदत होईल. नियामकाने सांगितले की,” त्यांना यासाठी आता महसूल विभागाकडून ई-केवायसीची मान्यता मिळाली आहे.”
नॅशनल पेन्शन सिस्टम आणि अटल पेन्शन योजना एफपीआरडीएच्या दोन प्रमुख योजना आहेत. एनपीएस ही संघटित क्षेत्रासाठीची एक पेन्शन योजना आहे तर अटल पेन्शन योजना हीप्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे.
एनपीएस म्हणजे काय ?
नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा एनपीएस (NPS) ही एक सरकारी रिटायरमेंट सेविंग स्कीम आहे, ही योजना 2004 मध्ये केंद्र सरकारने सुरू केली. 2009 पासून ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीदेखील उघडली गेली.
अटल पेन्शन योजना म्हणजे काय ?
अटल निवृत्तीवेतन योजना अत्यंत कमी वेळात लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. लाँच झाल्याच्या केवळ 5 वर्षातच, याच्या ग्राहकांची संख्या सुमारे 2.4 कोटी झाली आहे. ही पेन्शन योजना ही भारतीय नागरिकांसाठी हमी दिलेली पेन्शन योजना आहे. 9 मे 2015 रोजी हे लाँच केले गेले. यापैकी सर्वाधिक 52.55 टक्के ग्राहक हे 21 ते 30 वर्षे या वयोगटातील आहेत. या योजनेत जितक्या लहानपणी तुम्ही सामील व्हाल तितका तुम्हाला जास्त फायदा होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.