हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Options) आपल्या देशात गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे पर्याय देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना सोने खरेदीचा पर्याय हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूकीचा पर्याय आहे असे वाटते. ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असणारे गुंतवणूकदार यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.
मात्र गेल्या काही काळात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, सोने, मुदत ठेवी, बचत खाती असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मग अशावेळी अनेकदा गुंतवणूकदारांना नेमकी कुठे गुंतवणूक करणे फायदेशीर आहे? याबाबत गुंतागुंत जाणवते. तुम्हीही जर गुंतवणुकीच्या बाबतीत असेच कन्फ्युज होत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी.
अनेक लोक सोने खरेदीच्या पर्यायाला गुंतवणुकीसाठी पसंती देतात. (Investment Options) मात्र मुदत ठेव अर्थात एफडी हा गुंतवणुकीचा पर्याय गेल्या काही काळात अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे सोने खरेदी योजनांमध्ये गुंतवणूक करावी का एफडी मध्ये पैसे गुंतवावे? असा प्रश्न पडत असेल तर त्यात तुमचा दोष नाही. मग अशावेळी सर्वात आधी गुंतागुंत करणारे घटक समजून घेऊ. गुंतवणूकदार बचहतीसाठी अधिक सोने खरेदी करतात. मग या योजनांसमोर एफडी कशी फायदेशीर आहे आणि काय लाभ देऊ शकते? हे जाणून घेऊया.
सोने खरेदी योजना (Gold Purchase Scheme) : (Investment Options)
सोने खरेदी योजना अर्थात जीपीएसद्वारा प्रतिमहिना पैसे जमा केले जातात. ज्यामधून गुंतवणूकदार भविष्यात सोने खरेदी करू शकतात. सध्या, कोणतीही संस्था त्याचे नियमन करत नाही. यामुळे अशा योजना चालवणाऱ्या लोकप्रिय ज्वेलरी हाऊसेसमध्ये मॅच्युरिटीवरील परतावा वेगवेगळा असू शकतो हे लक्षात घ्या. त्यांच्या दरातील कोणतेही चढउतार हे मॅच्युरिटीवर खरेदीवेळी व्यवस्थापित केले जाऊ शकतात.
(Investment Options) जसे की, जीपीएसच्या सुरुवातीला सोन्याचा दर ५,५०० रुपये प्रति ग्रॅम असेल तर मॅच्युरिटीवेळी ६ हजार रुपये प्रति ग्रॅम असेल. अर्थात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ५ हजार ५०० रुपयांच्या सुरुवात दराने खरेदी करता येईल. यानुसार, गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना निश्चित दराने अधिक सोने ठेवता येते.
मुदत ठेव (Fixed Deposit) :
मुदत ठेव अर्थात FD हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. जो गेल्या काही काळात अनेक गुंतवणूकदारांनी विशेष पसंत केला आहे. हा एक असा गुंतवणुकीचा पर्याय आहे जो मुदत पूर्तीनंतर निश्चित व्याज दराची हमी देतो. त्यामुळे गुंतवणूकदार एफडीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. यासाठी कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँक वा NBFC मध्ये खाते उघडता येते. (Investment Options)
शिवाय बँका, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेशन्सकडे देखील एफडी तयार केली जाते. यासाठी विविध व्याजदर आणि कालावधीचे पर्याय उपलब्ध असतात. मुख्य म्हणजे एफडी अत्यंत कमी जोखीम आणि विश्वासार्ह गुंतवणूक योजना आहे. जिच्या मॅच्युरिटीनंतर खात्रीशीर रक्कम गुंतवणूकदारांना प्रदान केली जाते. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर मिळतो.
कर लाभ पात्रता
जीपीएस ही योजना मालमत्ता खरेदीचा गुंतवणूक पर्याय आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत केले जाणारे पेमेंट रोखीने केले जात नाही. परिणामी हे पेमेंट करपात्र म्हणून ग्राह्य धरले जात नाही. तर दागिन्यांची शेड्यूल AL मध्ये नोंद करणे आवश्यक असते. ज्यामुळे दागिन्यांवरील शुल्कात सूट दिल्याने गुंतवणूकदारांना अतिरिक्त फायदे मिळतात. या दरम्यान १ महिन्याचा हप्ता मिळतो. त्यामुळे सोन्याचे दर कितीही कमी- जास्त झाले तरी आनंदाच्या प्रसंगी सोने खरेदी केली जातो. (Investment Options)