हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील ४ था सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आहे. तर दुसरीकडे चेन्नईने त्यांच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य मुंबई वर मात केली आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स चा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्याचबरोबर चेन्नईच्या संघासाठी चांगली बातमी म्हणजे ऋतुराज गायकवाड परतला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्यासाठी सज्ज आहे.
मुंबई विरुद्धच्या धमाकेदार कामगिरीमुळे चेन्नईचा आत्मविश्वास वाढला आहे. पहिल्या सामन्यात अंबाती रायुडू आणि सॅम करनने शानदार कामगिरी करून स्वत: ला सिद्ध केले आहे. तसेच शेन वॉटसन आणि फाफ डुप्लेसीस यांच्या मुळे चेन्नई ची फलंदाजी तगडी वाटते.गोलंदाजी मधेही दीपक चहर आणि लुंगी एनगिडी चेन्नई साठी जबरदस्त कामगिरी करत आहेत.
तर दुसरीकडे राजस्थान रॉयल साठी हा खूप खडतर सामना असेल. बेन स्टोक्स आणि स्टीव्ह स्मिथशिवाय राजस्थान रॉयल्सला सीएसकेचे आव्हान अवघड जाणार आहे. पहिल्या सामन्यात बेन स्टोक्स संघाबाहेर आहे, तर दुखापत झालेल्या स्मिथच्या खेळण्यावर संशय आहे. जॉस बटलरसुद्धा पहिल्या सामन्यातून बाहेर पडेल, कारण तो आपल्या कुटूंबासह स्वतंत्रपणे आला आहे. त्यामुळे त्याला क्वारंटाइनमध्ये 36 तास दुबईतच रहावे लागेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना कोठे खेळला जाईल?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना कधी सुरू होईल?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण आपण कुठे पाहू शकता?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्कवर आणि हॉटस्टारवर पाहता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’