हॅलो महाराष्ट्र । इंडियन प्रिमियर लीग २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात बीसीसीआयने एक मोठा बदल केला आहे. काल आयपीएलच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत आयपीएल २०२० मध्ये यावेळी बीसीसीआयने एका नव्या नियमाचा समावेश केला आहे. या नियमामुळे सामन्याचा निकाल बदलण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार सामन्यात एखादा फलंदाज अथवा गोलंदाज जखमी झाला, आणि अशा परिस्थितीत तो सामना खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू सामना खेळू शकेल. एखादा फलंदाज जखमी झाला तर त्याच्या जागी नव्या दमाचा खेळाडू सामन्याचा निकाल बदलू शकतो. तसेच गोलंदाज देखील अशाच प्रकारे सामना फिरवू शकतो. या नियमामुळं अटीतटीच्या सामन्यांत रंगत आणि चुरस निर्माण होऊन सामन्यांच्या निकालात मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल – पंतप्रधान मोदी
महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..
विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!