हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएल2020 मध्ये गुणतालिकेत 14 गुण मिळवून प्ले ऑफ मधील आपलं स्थान जवळपास नक्की केलं आहे. परंतु कर्णधार रोहित शर्मा ची दुखापत ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. मुंबई इंडिअन्सने सोमवारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले. मागील दोन सामने मैदानाबाहेर बसलेल्या कर्णधार रोहित ( Rohit Sharma) चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असून तो आयपीएलमधूनही माघार घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चा सुरू असताना MI नं त्याच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला नाही. त्यात आज तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली. नवदीप सैनीला तीनही संघात स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त रोहित शर्माचे नाव निवड केलेल्या एकाही संघात नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळाले आहे.
Just what we love to see! Hitman in action at today’s training 😍#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
मुंबई इंडियन्सने ट्विटर वर रोहित शर्मा सराव करत असल्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रोहित शर्माने दुखापतीतुन सावरत नेट्स मध्ये कसून सराव करत जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी निःश्वास टाकला. रोहित शर्मा मुंबईचा खरा आधारस्तंभ असून तो संघात परतणे मुंबई साठी खुप महत्त्वाचे आहे. रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबईने तब्बल 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’